पुस्तक परिचय

पुस्तकाचे नाव :
विद्रोही तुकाराम
लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे
पुस्तकाविषयी:
संत तुकाराम महाराज म्हणजे मराठी माणसाच्या मनात अतीव आदर आणि श्रद्धेचे स्थान प्राप्त असलेले व्यक्तिमत्व होय. परंतु त्याच वेळी ते एक अतिशय व्यवहारशून्य, मावळ व्यक्तिमत्व असल्याची प्रतिमा काही लेखक आणि कीर्तनकारांनी उभी केली होती. प्रत्यक्षात तुकाराम महाराज हे व्यवहारशून्य नव्हतेच. काही मतलबी लोकांनी एका वाघाचे वर्णन शेळीच्या वर्णनाप्रमाणे केले होते, हे डॉ. आ. ह.साळुंखे यांचे 'विद्रोही तुकाराम' हे पुस्तक वाचल्यावर लक्षात येते. डॉ. आ. ह. साळुंखे हे मराठीतील प्रसिद्ध प्राच्यविद्यापंडित आहेत. त्यांनी आजवर अनेक संशोधन ग्रंथ लिहिले आहेत. 'विद्रोही तुकाराम' हे त्यांचे अतिशय गाजलेले व तितकेच वादग्रस्त ठरलेले पुस्तक आहे. पण आज त्या पुस्तकातील संशोधन मराठी समजाने, अभ्यासकांनी स्वीकारले आहे. संत तुकारामांच्या मृत्यूविषयी डॉ. आ.ह.साळुंखे यांनी उपस्थित केलेले मुद्दे खूप चर्चिले गेले. संत तुकारामांचे क्रांतिकारी विचार समाजापुढे पहिल्यांदा या पुस्तकाद्वारेच आधुनिक मराठी वाचकांपुढे आले म्हटले तर वावगे ठरणार नाही. तुकारामांचे धर्माबद्दलचे विचार, त्यांची देव कल्पना, जातीव्यवस्थेबद्दलची चीड, सनातनी कर्मठता, तुकारामांना सोसावा लागलेला छळ, त्यांच्यावर धर्ममार्तंडांनी भरलेला खटला, तुकारामांचे सुहृदय मन आणि तितकीच कठोर भूमिका, या सर्वांची चर्चा या पुस्तकात केली आहे. संत तुकारामांचे भक्त असलेल्या आणि नसलेल्या लोकांनी सुद्धा वाचलेच पाहिजे असे हे पुस्तक आहे. 
ऑनलाईन खरेदीसाठी लिंक- https://amzn.to/2EqULS6
                                            http://fkrt.it/CRTeZKNNNN
                                            http://fkrt.it/CtoQkKNNNN

पुस्तक परिचय

पुस्तकाचे नाव :
सेपियन्स : मानव जातीचा अनोखा इतिहास
लेखक : युव्हाल नोव्हा हरारी
भाषांतर : वासंती फडके
पुस्तकाविषयी:
१ लाख वर्षांपूर्वी मानवाच्या कमीत कमी ६ उपजाती अस्तित्वात होत्या. आज फक्त एकच अस्तित्वात आहे. ती जात म्हणजे 'सेपियन्स'. या सेपियन्स जातीने मानवी संस्कृती कशी निर्माण केली? पृथ्वीवर अधिसत्ता कशी निर्माण केली? भटक्या जमाती स्थिर कशा झाल्या आणि त्यातून राज्ये आणि शहरे माणसाने कशी वसवली? देव ही गोष्ट कशी आकाराला आली, राजांना महत्व कसे आले ते मानवी हक्कांची जाणीव कशी निर्माण झाली? भविष्यकालीन समाज कसा असेल? अश्या अनेक प्रश्नांचा उहापोह 'सेपियन्स : मानव जातीचा अनोखा इतिहास' या पुस्तकात करण्यात आलेला आहे. मूळचे हिब्रू भाषेतील पुस्तक हे इस्राईल मधील प्रसिद्ध विचारवंत युव्हाल नोव्हा हरारी यांनी लिहिलेले आहे. 
या पुस्तकाने मानवी संस्कृती कडे आणि उत्क्रांती कडे बघण्याचा नवीन दृष्टीकोन दिल्याची चर्चा अनेक इंग्रजी वृत्तपत्रांनी केलेली आहे. हे पुस्तक मराठीत अनुवादित केले आहे ते वासंती फडके यांनी.

     ओघवती भाषा आणि अचूक अनुवाद यामुळे या पुस्तकाची सध्या जोरदार चर्चा आहे. मानवाची आजपर्यंतची जडणघडण समजून घेण्यासाठीन हे पुस्तक वाचायलाच हवे. 
ऑनलाईन खरेदीसाठी लिंक- https://amzn.to/2LMRAZP
                                           https://amzn.to/2kBn7Sh

मास्तरांची सावली

पुस्तक परिचय

पुस्तकाचे नाव- मास्तरांची सावली
लेखिका- कृष्णाबाई नारायण सुर्वे
पुस्तकाविषयी-
या पुस्तकाच्या लेखिका कृष्णाबाई सुर्वे या कविवर्य नारायण सुर्वे यांच्या पत्नी होत. नारायण सुर्वे आणि कृष्णाबाई सुर्वे यांचे जीवन एकमेकांसाठीच होते. दोघेही तसे अनाथच होते. लहानपणापासून असलेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि कृष्णाबाईंनी घरच्यांचा विरोध पत्करून नारायण यांचा हात धरला तो कधीही न सोडण्यासाठी. 
लग्नानंतरची नवलाई वाट्याला आली नाही तरी त्याबाबत खंत न बाळगता तो काळ त्यांनी घराच्या शोधात घालविला. कामगार चळवळीचे काम करणाऱ्या सुर्वे यांची ओळख जगाला नंतर कवी म्हणून झाली. त्यानंतर आयुष्य बदलले. या सर्व काळात मिळालेले अनुभव कृष्णाबाई सुर्वे यांनी 'मास्तरांची सावली' मधून कथन केले आहेत. कोणत्याही ऐहिक सुखाची अपेक्षा न धरता मास्तरांची सावली बनून वावरलेल्या कृष्णाबाईंचे हे आत्मकथन उत्कट आहे. पती-पत्नीच्या नात्याचा खरा अर्थ यातून उलगडतो. 
ऑनलाईन खरेदीसाठी लिंक- https://amzn.to/2EpMH3W

आधुनिक भारताचे विचारस्तंभ


पुस्तक परिचय
पुस्तकाचे नाव :
आधुनिक भारताचे विचारस्तंभ
लेखक :
प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा (अनुवाद : शारदा साठे)
पुस्तकाविषयी :
रामचंद्र गुन्हा यांनी 11 विचारवंताच्या विचार व कार्यावर या पुस्तकातून प्रकाश टाकला आहे. हे विचारवंत समाजात मान्यताप्राप्त नेते होते, विचारवंत होते आणि त्यांनी भारताच्या जडणघडणीमध्ये खूप मोठे योगदान दिले आहे.
महात्मा गांधींपासून तर हमीद दलवाईंपर्यंत ज्या ज्या विचारवंतांनी आधुनिक भारत घडवण्यासाठी आपले वैचारिक व कृतियुक्त योगदान दिले त्यातील काही महत्वाच्या विचारवंतांच्या कार्याचा भारतीय 
 जनमानसावर  प्रभाव पडला. त्याचा सविस्तर धांडोळा रामचंद्र गुहा घेतात. विचारवंतच्या आजवर न वाचलेल्या पैलूंवर रामचंद्र गुहा यांनी अत्यंत रंजकपणे प्रकाश टाकला आहे. "भारत" ही संकल्पना स्पष्ट करणारा ग्रंथ म्हणजे - आधुनिक भारताचे विचारस्तंभ.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना तर अत्यंत महत्वाचे हे पुस्तक आहे. भारत कसा घडला याबद्दल हे पुस्तक अत्यंत
व्यापक दृष्टिकोन देतो.
नक्की वाचावं अस पुस्तकं..
ऑनलाईन खरेदीसाठी लिंक- https://amzn.to/2GYheeD

गांधीजी आणि त्यांचे टीकाकार

पुस्तक परिचय

पुस्तकाचे नाव :
गांधीजी आणि त्यांचे टीकाकार
लेखक :
प्रसिद्ध पत्रकार सुरेश द्वादशीवार
पुस्तकाविषयी :
गांधीजी आणि त्यांचे टीकाकार हे पुस्तक वैचारिक पण सोप्प असं पुस्तक आहे. गांधीजींना किंवा त्यांच्या टीकाकारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे न करता, टिकेमागील भूमिका, त्याचा खरेखोटेपणा तपासातुन इ. गोष्टी तपासून पाहिल्या आहेत. गुंतागुंतीच्या अनेक प्रश्नांतून टीकेच्या बाबत स्पष्ट स्वरूप मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचे विविध अंगाने आकलन करण्यासाठी सुरेश द्वादशीवार आपल्याला या पुस्तकात नवीन आणि वेगळी दृष्टी देऊ पाहतात.
द्वादशीवार गांधीजी सोबत टिळक, गोखले यांचा तुलनात्मक अभ्यास मांडतात तर त्यांचे गूढ उलगडताना कस्तुरबा आणि गांधीजींच्या वाट्याला आलेल्या स्वातंत्र्याचा देखील उहापोह करतात.
गांधीजी आणि टागोर यांच्यातील राष्ट्रवादाच्या संकल्पनेतील वैविध्य मांडत असताना गांधीजी व टॉल्स्टॉय यांची देखील तुलना केली आहे. सर्वात रंजक आणि मजेशीर मांडणी आहे ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांच्या संघर्षातील. या दोन नेत्यांच्या एकमेकांवरील प्रभावाची चर्चा आपल्याला इथे वाचायला मिळेल.
गांधीजी आणि नेताजी सुभाष, मार्क्सवादी, जिना, अबुल कलाम आझाद याच बरोबर विस्टन चर्चिल यांच्यावर देखील स्वतंत्र लेखन या पुस्तकात आहे. गांधीजींना वेगळ्या, त्यांच्या टीकाकारांच्या नजरेतून कसे पाहता येईल आणि सगळ्या विविध भूमिका कश्या लक्षात घेता येतील यावर हे पुस्तक प्रकाश टाकते. शेवटी दोन ओळीत लेखकाने स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे तो म्हणतो- हे लेखन... यातली भूमिका तटस्थ नाही, ती सत्याच्या अधिकाधिक जवळ राहण्याची आहे. हे पुस्तक राज्यशास्त्राचे,इतिहास आणि तत्वज्ञानाच्या विद्यार्थी व अभ्यासकासाठी मोठी ठेव आहे, तसेच स्पर्धा परीक्षेत देखील तुलनात्मक विचार करून सादरीकरणासाठी उपयुक्त आहे.
ऑनलाईन खरेदीसाठी लिंक- https://amzn.to/2GBY4vG

शहीद भगतसिंग - समग्र वाडमय

पुस्तक परिचय

पुस्तकाचे नाव :
शहीद भगतसिंग - समग्र वाडमय
संपादक : दत्ता देसाई
मूळ दस्तऐवज : प्रा.चमनलाल
पुस्तकाविषयी:
शहीद भगतसिंग यांचे साहित्य म्हणजे देशाला दिशादिग्दर्शन करणारे साहित्य आहे. वयाच्या 21 व्या वर्षी हा क्रांतिकारक भारतीय समाजाविषयी सर्वांगाने मुल्भूच चिंतन करतो आणि ते लेखणीतून कागदावर उतरवतो, ही गोष्टच क्रांतिकारक आहे. 
भगतसिंग यांचे साहित्य हे अनेक अंगाने आशावादी साहित्य आहे. या पुस्तकात ते एकत्रित केले आहे. ज्यात मी नास्तिक का आहे? पासून तर त्यांची अनेक पत्रे, अस्पृश्यता निवारण यावर देखील लेखन आढळून येते.
भगतसिंग समजून घेण्यासाठी मुळात त्यांचे विचार घेणे आवश्यक ठरते. प्रा.चमनलाल यांनी हा दस्तऐवज एकत्रित केला आहे, ज्याचे मराठी संपादन डॉ.दत्ता देसाई यांनी केले आहे.
सदरचा ग्रंथ भगतसिंगांचे अंतरंग तर उलगडून दाखवेलच परंतु समाजभान किती सूक्ष्म असावे आणि त्याची मांडणी कशी करावी याचे देखील उत्तम उदाहरण देखील ठरेल.
राष्ट्रवादाचे केवळ घोषणा न देता भगतसिंग यांचा राष्ट्रवाद नेमका काय आहे हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचले पाहिजे.
ऑनलाईन खरेदीसाठी लिंक- https://amzn.to/2q9thw2

Books by S. M. Mushrif


S. M. Mushrif साहब की ये किताबें हर भारतवासी के पास पहुँचनी चाहिये| ज्यादा से ज्यादा शेअर करें|

1)    आर एस एस- देश का सबसे बडा आतंकवादी संघटन 
2)    Who Killed Karkare?: The Real Face of Terrorism in India Paperback – 28 Nov 2011
https://amzn.to/2Gbpnc3                              
3)      करकरे के हत्यारे कौन? भारत में आतंकवाद का असली चेहरा
4)      हू किल्ड करकरे? (मराठी)
5)      करकरे के कातील कौन (उर्दू)
6)      करकरेना कातीलो कौन? (गुजराती)

स्पर्धा परीक्षा पुस्तके



ही आहे स्पर्धा परीक्षांसाठी लागणाऱ्या पुस्तकांची यादी. केवळ पुस्तके मिळत नसल्याने स्पर्धा परीक्षांमध्ये मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. बऱ्याच मुलांना ही पुस्तके कुठून मिळवावीत हेही माहित नसते. अशा विद्यार्थ्यांसाठी ही यादी उपयुक्त ठरेल. या यादीत पुस्तकाच्या नावाबरोबर ते पुस्तक ऑनलाईन खरेदी करण्यासाठी लिंकही दिलेली आहे. त्या लिंकवरून ते पुस्तक खरेदी करता येईल. ही यादी शेअर करा. कुणाच्यातरी नक्की उपयोगी पडेल. स्पर्धा परीक्षांत मराठी टक्का नक्की वाढेल.
१)        STI-PSI-ASO Pariksha Margadarshak Thokla - 23rd Edition (Marathi

२)        स्पर्धा परीक्षा : गणित
३)        MPSC प्रश्नसंच १२०००+
४)        भारतीय राज्यघटना: वस्तुनिष्ठ प्रश्नसंच (UPSC/MPSC साठी)
५)        आधुनिक भारताचा इतिहास
६)        भारतीय अर्थव्यवस्था (भगीरथ प्रकाशन)
७)        भारताची राज्यघटना आणि प्रशासन (भगीरथ प्रकाशन)
८)        आधुनिक भारताचा इतिहास (भगीरथ प्रकाशन)
९)        विज्ञान तंत्रज्ञान आणि विकास (UPSC/MPSC साठी)
१०)    मानव संसाधन विकास आणि मानवाधिकार (भगीरथ प्रकाशन)
११)    संपूर्ण गणित : क्लृप्त्या आणि सूत्रे (चैताली प्रकाशन)
१२)    सामान्य भूगोल प्रश्नसंच ३१००+ (ज्ञानदीप)
१३)    इतिहास प्रश्नसंच ५०००+ (ज्ञानदीप)
१४)    सामान्य अध्ययन (MPSC पूर्व परीक्षा) सराव प्रश्नसंच
१५)    भारताचा समग्र इतिहास (Unique Academy)
१६)    पंचायत राज
१७)    महाराष्ट्राचा भूगोल
१८)    नाथे महाराष्ट्र व भारत वार्षिकी २०१८
१९)    महाराष्ट्र वार्षिकी (युनिक अकादमी)
२०)    MPSC झालले पेपर्स
२१)    परिपूर्ण मराठी व्याकरण
२२)    संपूर्ण इंग्रजी व्याकरण
२३)    बुद्धीमाप्न चाचणी
२४)    पोलीस भरती: संपूर्ण मार्गदर्शक
२५)    MPSC पूर्व परीक्षा: संपूर्ण तयारी ठोकळा K.Sagar
२६)    संपूर्ण सामान्य ज्ञान
२७)    इंडिया इयर बुक २०१८
२८)    MPSC प्रश्नसंच १००००+
२९)    समग्र महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल
३०)    राज्यसेवा पूर्व परीक्षा CSAT
३१)    अत्यावश्यक मराठी व्याकरण
३२)    आपले संविधान
३३)    IAS ची पाऊलवाट
३४)    PSI/STI/ASO सराव पेपर संच
३५)    संपूर्ण भूगोल
३६)    महाराष्ट्रातील पंचायत राज आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था
३७)    विज्ञान तंत्रज्ञान व विकास (Unique Academy)
३८)    संपूर्ण गणित
३९)    भारतीय अर्थव्यवस्था
४०)    पर्यावरण परिस्थितीकी
४१)    जैवतंत्रज्ञान
४२)    प्राचीन भारत
४३)    अंकगणिताचा दीपस्तंभ
४४)    MPSC मराठी व इंग्रजी प्लॅनर
४५)    फौजदार यशोमार्ग
४६)    अभिनव जनरल नॉलेज
४७)    PSI-STI-ASO पूर्व परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक
४८)    The Analyst (MPSC & UPSCप्रश्नपत्रिकांचे विश्लेषण)
४९)    मानवी हक्क
५०)    MPSC CSAT सिम्पलीफाईड
५१)    MPSC Maharashtra Engineering Services Combined Preliminary Examination
५२)    कृषिविषय