शहीद भगतसिंग - समग्र वाडमय

पुस्तक परिचय

पुस्तकाचे नाव :
शहीद भगतसिंग - समग्र वाडमय
संपादक : दत्ता देसाई
मूळ दस्तऐवज : प्रा.चमनलाल
पुस्तकाविषयी:
शहीद भगतसिंग यांचे साहित्य म्हणजे देशाला दिशादिग्दर्शन करणारे साहित्य आहे. वयाच्या 21 व्या वर्षी हा क्रांतिकारक भारतीय समाजाविषयी सर्वांगाने मुल्भूच चिंतन करतो आणि ते लेखणीतून कागदावर उतरवतो, ही गोष्टच क्रांतिकारक आहे. 
भगतसिंग यांचे साहित्य हे अनेक अंगाने आशावादी साहित्य आहे. या पुस्तकात ते एकत्रित केले आहे. ज्यात मी नास्तिक का आहे? पासून तर त्यांची अनेक पत्रे, अस्पृश्यता निवारण यावर देखील लेखन आढळून येते.
भगतसिंग समजून घेण्यासाठी मुळात त्यांचे विचार घेणे आवश्यक ठरते. प्रा.चमनलाल यांनी हा दस्तऐवज एकत्रित केला आहे, ज्याचे मराठी संपादन डॉ.दत्ता देसाई यांनी केले आहे.
सदरचा ग्रंथ भगतसिंगांचे अंतरंग तर उलगडून दाखवेलच परंतु समाजभान किती सूक्ष्म असावे आणि त्याची मांडणी कशी करावी याचे देखील उत्तम उदाहरण देखील ठरेल.
राष्ट्रवादाचे केवळ घोषणा न देता भगतसिंग यांचा राष्ट्रवाद नेमका काय आहे हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचले पाहिजे.
ऑनलाईन खरेदीसाठी लिंक- https://amzn.to/2q9thw2

No comments:

Post a Comment