पुस्तक परिचय

पुस्तकाचे नाव :
विद्रोही तुकाराम
लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे
पुस्तकाविषयी:
संत तुकाराम महाराज म्हणजे मराठी माणसाच्या मनात अतीव आदर आणि श्रद्धेचे स्थान प्राप्त असलेले व्यक्तिमत्व होय. परंतु त्याच वेळी ते एक अतिशय व्यवहारशून्य, मावळ व्यक्तिमत्व असल्याची प्रतिमा काही लेखक आणि कीर्तनकारांनी उभी केली होती. प्रत्यक्षात तुकाराम महाराज हे व्यवहारशून्य नव्हतेच. काही मतलबी लोकांनी एका वाघाचे वर्णन शेळीच्या वर्णनाप्रमाणे केले होते, हे डॉ. आ. ह.साळुंखे यांचे 'विद्रोही तुकाराम' हे पुस्तक वाचल्यावर लक्षात येते. डॉ. आ. ह. साळुंखे हे मराठीतील प्रसिद्ध प्राच्यविद्यापंडित आहेत. त्यांनी आजवर अनेक संशोधन ग्रंथ लिहिले आहेत. 'विद्रोही तुकाराम' हे त्यांचे अतिशय गाजलेले व तितकेच वादग्रस्त ठरलेले पुस्तक आहे. पण आज त्या पुस्तकातील संशोधन मराठी समजाने, अभ्यासकांनी स्वीकारले आहे. संत तुकारामांच्या मृत्यूविषयी डॉ. आ.ह.साळुंखे यांनी उपस्थित केलेले मुद्दे खूप चर्चिले गेले. संत तुकारामांचे क्रांतिकारी विचार समाजापुढे पहिल्यांदा या पुस्तकाद्वारेच आधुनिक मराठी वाचकांपुढे आले म्हटले तर वावगे ठरणार नाही. तुकारामांचे धर्माबद्दलचे विचार, त्यांची देव कल्पना, जातीव्यवस्थेबद्दलची चीड, सनातनी कर्मठता, तुकारामांना सोसावा लागलेला छळ, त्यांच्यावर धर्ममार्तंडांनी भरलेला खटला, तुकारामांचे सुहृदय मन आणि तितकीच कठोर भूमिका, या सर्वांची चर्चा या पुस्तकात केली आहे. संत तुकारामांचे भक्त असलेल्या आणि नसलेल्या लोकांनी सुद्धा वाचलेच पाहिजे असे हे पुस्तक आहे. 
ऑनलाईन खरेदीसाठी लिंक- https://amzn.to/2EqULS6
                                            http://fkrt.it/CRTeZKNNNN
                                            http://fkrt.it/CtoQkKNNNN

No comments:

Post a Comment