गुजरात फाईल्स

 मित्रहो, आज आणखी एका पुस्तकाची शिफारस मी आपणांस करत आहे. पुस्तकाचे नाव आहे *गुजरात फाईल्स*

लेखिका- राणा अय्युब

एका २५ वर्षे वयाच्या तरुणीने स्वतःचा जीव जोखमीत घालून केलेल्या शोध पत्रकारितेचे रिपोर्टिंग आहे हे. पण एखाद्या थरारक कादंबरीला लाजवेल अशी कहाणी आहे ही. आपण जरूर हे पुस्तक वाचा. आपल्या जवळच्या पुस्तक दुकानात या पुस्तकाची मागणी करा. नाहीच मिळाले तर या पुस्तकाच्या ऑनलाईन शॉपिंग पोर्टलवरील लिंक्स पाठवून देतो. त्यावरून हे पुस्तक खरेदी करा.


https://amzn.to/35m9ePU


https://amzn.to/3kluoC7


http://fkrt.it/T2GwfmuuuN

गोडसे म्हटलं कि जसं 'गांधी' हा विषय आलाच अगदी तसंच गोडसे म्हटलं कि 'सावरकर'ही आलेच.

आयुष्यभर राजकीय क्रांतीची भाषा बोलून शस्त्राचार सांगणाऱ्या आणि हिंदुत्वाची जाज्वल्य मांडणी करणाऱ्या सावरकरांचा मृत्यू हा शेवटी उपोषण करून, (प्रायोपवेशन) आत्मार्पण करून व्हावा आणि रामनामाचा जप करत आमरण उपोषणासारख्या स्वपिडा देणाऱ्या मार्गाचा आपल्या राजकारणात सातत्याने उपयोग करणाऱ्या गांधींचा मृत्यू हा प्रार्थनेला जाताना रक्त सांडून व्हावा, हाही नियतीचा खेळच म्हणायला हवा.



दोन प्रवृत्तींमधील द्वंद्व अधोरेखित करणारी कादंबरी...
#OhMyGodse
_Book available on :_

_Amazon :_ https://amzn.to/2XRRt4h

_Flipkart :_ http://fkrt.it/1zrkuPNNNN


पुस्तक परिचय

पुस्तकाचे नाव :
विद्रोही तुकाराम
लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे
पुस्तकाविषयी:
संत तुकाराम महाराज म्हणजे मराठी माणसाच्या मनात अतीव आदर आणि श्रद्धेचे स्थान प्राप्त असलेले व्यक्तिमत्व होय. परंतु त्याच वेळी ते एक अतिशय व्यवहारशून्य, मावळ व्यक्तिमत्व असल्याची प्रतिमा काही लेखक आणि कीर्तनकारांनी उभी केली होती. प्रत्यक्षात तुकाराम महाराज हे व्यवहारशून्य नव्हतेच. काही मतलबी लोकांनी एका वाघाचे वर्णन शेळीच्या वर्णनाप्रमाणे केले होते, हे डॉ. आ. ह.साळुंखे यांचे 'विद्रोही तुकाराम' हे पुस्तक वाचल्यावर लक्षात येते. डॉ. आ. ह. साळुंखे हे मराठीतील प्रसिद्ध प्राच्यविद्यापंडित आहेत. त्यांनी आजवर अनेक संशोधन ग्रंथ लिहिले आहेत. 'विद्रोही तुकाराम' हे त्यांचे अतिशय गाजलेले व तितकेच वादग्रस्त ठरलेले पुस्तक आहे. पण आज त्या पुस्तकातील संशोधन मराठी समजाने, अभ्यासकांनी स्वीकारले आहे. संत तुकारामांच्या मृत्यूविषयी डॉ. आ.ह.साळुंखे यांनी उपस्थित केलेले मुद्दे खूप चर्चिले गेले. संत तुकारामांचे क्रांतिकारी विचार समाजापुढे पहिल्यांदा या पुस्तकाद्वारेच आधुनिक मराठी वाचकांपुढे आले म्हटले तर वावगे ठरणार नाही. तुकारामांचे धर्माबद्दलचे विचार, त्यांची देव कल्पना, जातीव्यवस्थेबद्दलची चीड, सनातनी कर्मठता, तुकारामांना सोसावा लागलेला छळ, त्यांच्यावर धर्ममार्तंडांनी भरलेला खटला, तुकारामांचे सुहृदय मन आणि तितकीच कठोर भूमिका, या सर्वांची चर्चा या पुस्तकात केली आहे. संत तुकारामांचे भक्त असलेल्या आणि नसलेल्या लोकांनी सुद्धा वाचलेच पाहिजे असे हे पुस्तक आहे. 
ऑनलाईन खरेदीसाठी लिंक- https://amzn.to/2EqULS6
                                            http://fkrt.it/CRTeZKNNNN
                                            http://fkrt.it/CtoQkKNNNN

पुस्तक परिचय

पुस्तकाचे नाव :
सेपियन्स : मानव जातीचा अनोखा इतिहास
लेखक : युव्हाल नोव्हा हरारी
भाषांतर : वासंती फडके
पुस्तकाविषयी:
१ लाख वर्षांपूर्वी मानवाच्या कमीत कमी ६ उपजाती अस्तित्वात होत्या. आज फक्त एकच अस्तित्वात आहे. ती जात म्हणजे 'सेपियन्स'. या सेपियन्स जातीने मानवी संस्कृती कशी निर्माण केली? पृथ्वीवर अधिसत्ता कशी निर्माण केली? भटक्या जमाती स्थिर कशा झाल्या आणि त्यातून राज्ये आणि शहरे माणसाने कशी वसवली? देव ही गोष्ट कशी आकाराला आली, राजांना महत्व कसे आले ते मानवी हक्कांची जाणीव कशी निर्माण झाली? भविष्यकालीन समाज कसा असेल? अश्या अनेक प्रश्नांचा उहापोह 'सेपियन्स : मानव जातीचा अनोखा इतिहास' या पुस्तकात करण्यात आलेला आहे. मूळचे हिब्रू भाषेतील पुस्तक हे इस्राईल मधील प्रसिद्ध विचारवंत युव्हाल नोव्हा हरारी यांनी लिहिलेले आहे. 
या पुस्तकाने मानवी संस्कृती कडे आणि उत्क्रांती कडे बघण्याचा नवीन दृष्टीकोन दिल्याची चर्चा अनेक इंग्रजी वृत्तपत्रांनी केलेली आहे. हे पुस्तक मराठीत अनुवादित केले आहे ते वासंती फडके यांनी.

     ओघवती भाषा आणि अचूक अनुवाद यामुळे या पुस्तकाची सध्या जोरदार चर्चा आहे. मानवाची आजपर्यंतची जडणघडण समजून घेण्यासाठीन हे पुस्तक वाचायलाच हवे. 
ऑनलाईन खरेदीसाठी लिंक- https://amzn.to/2LMRAZP
                                           https://amzn.to/2kBn7Sh

मास्तरांची सावली

पुस्तक परिचय

पुस्तकाचे नाव- मास्तरांची सावली
लेखिका- कृष्णाबाई नारायण सुर्वे
पुस्तकाविषयी-
या पुस्तकाच्या लेखिका कृष्णाबाई सुर्वे या कविवर्य नारायण सुर्वे यांच्या पत्नी होत. नारायण सुर्वे आणि कृष्णाबाई सुर्वे यांचे जीवन एकमेकांसाठीच होते. दोघेही तसे अनाथच होते. लहानपणापासून असलेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि कृष्णाबाईंनी घरच्यांचा विरोध पत्करून नारायण यांचा हात धरला तो कधीही न सोडण्यासाठी. 
लग्नानंतरची नवलाई वाट्याला आली नाही तरी त्याबाबत खंत न बाळगता तो काळ त्यांनी घराच्या शोधात घालविला. कामगार चळवळीचे काम करणाऱ्या सुर्वे यांची ओळख जगाला नंतर कवी म्हणून झाली. त्यानंतर आयुष्य बदलले. या सर्व काळात मिळालेले अनुभव कृष्णाबाई सुर्वे यांनी 'मास्तरांची सावली' मधून कथन केले आहेत. कोणत्याही ऐहिक सुखाची अपेक्षा न धरता मास्तरांची सावली बनून वावरलेल्या कृष्णाबाईंचे हे आत्मकथन उत्कट आहे. पती-पत्नीच्या नात्याचा खरा अर्थ यातून उलगडतो. 
ऑनलाईन खरेदीसाठी लिंक- https://amzn.to/2EpMH3W

आधुनिक भारताचे विचारस्तंभ


पुस्तक परिचय
पुस्तकाचे नाव :
आधुनिक भारताचे विचारस्तंभ
लेखक :
प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा (अनुवाद : शारदा साठे)
पुस्तकाविषयी :
रामचंद्र गुन्हा यांनी 11 विचारवंताच्या विचार व कार्यावर या पुस्तकातून प्रकाश टाकला आहे. हे विचारवंत समाजात मान्यताप्राप्त नेते होते, विचारवंत होते आणि त्यांनी भारताच्या जडणघडणीमध्ये खूप मोठे योगदान दिले आहे.
महात्मा गांधींपासून तर हमीद दलवाईंपर्यंत ज्या ज्या विचारवंतांनी आधुनिक भारत घडवण्यासाठी आपले वैचारिक व कृतियुक्त योगदान दिले त्यातील काही महत्वाच्या विचारवंतांच्या कार्याचा भारतीय 
 जनमानसावर  प्रभाव पडला. त्याचा सविस्तर धांडोळा रामचंद्र गुहा घेतात. विचारवंतच्या आजवर न वाचलेल्या पैलूंवर रामचंद्र गुहा यांनी अत्यंत रंजकपणे प्रकाश टाकला आहे. "भारत" ही संकल्पना स्पष्ट करणारा ग्रंथ म्हणजे - आधुनिक भारताचे विचारस्तंभ.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना तर अत्यंत महत्वाचे हे पुस्तक आहे. भारत कसा घडला याबद्दल हे पुस्तक अत्यंत
व्यापक दृष्टिकोन देतो.
नक्की वाचावं अस पुस्तकं..
ऑनलाईन खरेदीसाठी लिंक- https://amzn.to/2GYheeD

गांधीजी आणि त्यांचे टीकाकार

पुस्तक परिचय

पुस्तकाचे नाव :
गांधीजी आणि त्यांचे टीकाकार
लेखक :
प्रसिद्ध पत्रकार सुरेश द्वादशीवार
पुस्तकाविषयी :
गांधीजी आणि त्यांचे टीकाकार हे पुस्तक वैचारिक पण सोप्प असं पुस्तक आहे. गांधीजींना किंवा त्यांच्या टीकाकारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे न करता, टिकेमागील भूमिका, त्याचा खरेखोटेपणा तपासातुन इ. गोष्टी तपासून पाहिल्या आहेत. गुंतागुंतीच्या अनेक प्रश्नांतून टीकेच्या बाबत स्पष्ट स्वरूप मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचे विविध अंगाने आकलन करण्यासाठी सुरेश द्वादशीवार आपल्याला या पुस्तकात नवीन आणि वेगळी दृष्टी देऊ पाहतात.
द्वादशीवार गांधीजी सोबत टिळक, गोखले यांचा तुलनात्मक अभ्यास मांडतात तर त्यांचे गूढ उलगडताना कस्तुरबा आणि गांधीजींच्या वाट्याला आलेल्या स्वातंत्र्याचा देखील उहापोह करतात.
गांधीजी आणि टागोर यांच्यातील राष्ट्रवादाच्या संकल्पनेतील वैविध्य मांडत असताना गांधीजी व टॉल्स्टॉय यांची देखील तुलना केली आहे. सर्वात रंजक आणि मजेशीर मांडणी आहे ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांच्या संघर्षातील. या दोन नेत्यांच्या एकमेकांवरील प्रभावाची चर्चा आपल्याला इथे वाचायला मिळेल.
गांधीजी आणि नेताजी सुभाष, मार्क्सवादी, जिना, अबुल कलाम आझाद याच बरोबर विस्टन चर्चिल यांच्यावर देखील स्वतंत्र लेखन या पुस्तकात आहे. गांधीजींना वेगळ्या, त्यांच्या टीकाकारांच्या नजरेतून कसे पाहता येईल आणि सगळ्या विविध भूमिका कश्या लक्षात घेता येतील यावर हे पुस्तक प्रकाश टाकते. शेवटी दोन ओळीत लेखकाने स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे तो म्हणतो- हे लेखन... यातली भूमिका तटस्थ नाही, ती सत्याच्या अधिकाधिक जवळ राहण्याची आहे. हे पुस्तक राज्यशास्त्राचे,इतिहास आणि तत्वज्ञानाच्या विद्यार्थी व अभ्यासकासाठी मोठी ठेव आहे, तसेच स्पर्धा परीक्षेत देखील तुलनात्मक विचार करून सादरीकरणासाठी उपयुक्त आहे.
ऑनलाईन खरेदीसाठी लिंक- https://amzn.to/2GBY4vG